कोपरगाव पोलीस स्टेशनची दमदार कारवाई ८ वर्षापासून दरोडेच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी तसेच बेकायदेशीर गावठी हातभट्टीवर कोंबिंग ऑपरेशन करून केली कारवाई
June 20, 2023
0
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन नॉन बेलेबल व बेलेबल पकड वॉरंट मधील इसमांचा शोध घेऊन तसेच अवैद्य व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना बजावले होते त्यानुसार आज मंगळवार दिनांक २० जून २०२३ रोजी सायंकाळी १७.०० ते रात्री २०.०० वाजे दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचा पोलीस स्टाफ यांनी तालुक्यातील विविध गावांनमध्ये आरोपींचा शोध घेऊन तसेच पकड वॉरंटमधील आरोपींचा शोध घेऊन व अवैद्य दारू बनवणाऱ्या इसमांची माहिती घेऊन त्या ठिकाणी त्वरित कारवाई करून कोंबिंग ऑपरेशनची मोहीम राबवली सदर मोहिमेत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गु र नं १३/२०१६ भादवि कलम ३९५,४२० या दरोड्यातील गुन्ह्यातील आठ वर्षापासून फरार असलेला आरोपी रोहिदास सहादू बर्डे वय ३२ वर्ष राहणार हिंगणी तालुका कोपरगाव याचा शोध घेऊन त्यास मोठ्या शिताफीने अटक केली तसेच नॉनबेलेबल वॉरंट मधील १७ व नॉनबेलेबल वॉरंट बजावणी करून आरोपींना अटक करून मान.न्यायालयासमोर पुढील न्यायालयीन कार्यवाहीसाठी हजर केलेतसेच सहा बेलेबल वारंटाची बजावणी करण्यात आली आहे सदर मोहिमेत सुरेगाव येथे गावठी हातभट्टीवर छापा टाकून सदर ठिकाणी पप्पू पिंपळे राहणार मोतीनगर सुरेगाव तालुका कोपरगाव याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे ४०० लिटर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यास लागणारे कच्चे रसायन जप्त करून नाश करण्यात आले आहे याबाबत त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३१३/२०२३ मु. प्रो ॲ क ६५ (फ) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्रीमती स्वाती भोर मॅडम शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शना खाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांढेकर सुरेश गागरे पोलीस कॉन्स्टेबल संदीप बोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम शेख पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ रशीद शेख युवराज खुळे चंद्रकांत मेढे यांनी सदरची कारवाई केली त्याबद्दल कोपरगाव तालुक्यातून पोलीसांचे अभिनंदन होत आहे.