Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रासपा च्या कोपरगाव अध्यक्षपदी आशितोष जाधव , युवक अध्यक्षपदी महेश जानराव यांची निवड*


 प्रतिनिधी -

 शिर्डी येथे राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर नगरजिल्हाची बैठक पार पडली यावेळी या बैठकीत कोपरगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची  नव्याने कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. रासपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सय्यद बाबा शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव तालुका अध्यक्षपदी आशितोष जाधव , युवक तालुका अध्यक्षपदी महेश जानराव यांची निवड करण्यात आली असुन या बैठकीस रासपाचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब काटकर ,राहाता तालुका अध्यक्ष रमेश बनकर , अशोक जानराव ,  शिर्डी शहर अध्यक्ष वैभव सोनवणे , गणेश बनकर , प्रवीण बनकर , रविंद्र काटकर , लखन वाघ , ॲड अविनाश शेजवळ आदीसह राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्येकर्ते उपस्थित होते.प्रसंगी सय्यद शेख यांनी कोणतेही पद मोठे नसून आपण त्या पदाला योग्य न्याय दिला त्यासाठी समाजातील समस्या जाणून त्यावर काम केले तर तो कार्यकर्ता हा जनसामान्यात आपली ओळख निर्माण करुन यशस्वी होतोच असे सांगत रासपाचे जननायक महादेव जानकर यांच्या विचारधारेतुन तळागळातील वंचित घटकांसाठी कार्य करा असे स्पष्ट केले तर रासपाचे उत्तर नगरजिल्हा अध्यक्ष नानासाहेब काटकर यांनी नुतन अध्यक्षांना शुभेच्छा देत श्री साईबाबांच्या पवित्र भूमीत उत्साहात बैठक पार पडली आहे नुतन पदाधिकाऱ्यांनी सामाजिक दायित्व जपून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे आणि कोपरगाव तालुक्यात चांगले संघटन करुन पक्ष बळकट करुन आगामी ध्येयाकडे व समाजकारणाकडे वाटचाल करावी असे सांगत शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.