कोपरगाव:-कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर झालेल्या कार्यवाहीनंतर रिक्त झालेल्या तहसीलदार पदी संदीपकुमार भोसले यांची नियुक्तीची अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे सह सचिव डॉ.माधव वीर यांच्या स्वाक्षरीने निघाली आहे सदर आदेशात म्हटले आहे की सदरील आदेश तात्काळ अमलात येत असून उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांनी बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी त्यांच्या पदस्थापनेच्या पदावर दिनांक 15 जून 2023 रोजी किंवा पूर्वी रुजू होणे अनिवार्य आहे तसेच संबंधित अधिकारी नियुक्तीच्या जागी केव्हा हजर झाले याबाबत शासनास त्वरित कळवावे असे आदेशात स्पष्ट लिहिले आहे. तर चे आदेश 12 जून 2023 रोजी निघाला आहे.