कोपरगाव- सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने चालु खरीप हंगामासाठी शेतक-यांच्या सोयीसाठी महाबीज वाणाचे ५७६ क्विंटल सोयाबीन बियाणे अनुदान तत्वावर उपलब्ध करून दिले असुन त्याचा शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे. चालु खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणेबरोबरच मका, बाजरी, तुर आदि बियाणेही उपलब्ध आहेत. सोयाबीनचे फुले संगम, फुले किमया १६२ हे वाण शासनाच्या अनुदानावर उपलब्ध आहे त्यासाठी शेतकरी बांधवांनी स्वतःचा आधार क्रमांक, सात बारा, आठ अ उतारा, बँक खाते पासबुक झेरॉक्स प्रत नजिकच्या सेतु केंद्रावर जाऊन महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून अर्ज करावेत. उल्लेखीत सोयाबीन वाण शासकीय बियाणे परवाना (परमिट) तालुका कृषी अधिकारी व त्यांचे यंत्रणेमार्फत उपलब्ध करून शेतकरी सहकारी संघात द्यावे व शेतकऱ्यांना १६५० रुपये प्रति बॅग भरून बियाणे उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे दुध उत्पादक शेतक-यांसाठी महाबीज कंपनीने उदय वाण या नावाने मुरघासाचे बियाणे विकसीत केले आहे, महाबीज बियाणा व्यतिरिक्त अन्य नामांकित कंपन्यांची बियाणेही उपलब्ध आहेत तेंव्हा या दोन्ही योजनेतील बियाणे लाभासाठी शेतक-यांनी वेळीच नजिकच्या शेतकरी सहकारी संघाशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष अंबादास देवकर, उपाध्यक्ष बाजीराव मांजरे, माजी अध्यक्ष संभाजीराव गावंडे, संचालक रघुनाथ फटांगरे, नानासाहेब थोरात, रामभाऊ शिंदे, चंद्रकांत देवकर आदि सर्व संचालकानी केले आहे