हार, तुरे, जाहिरात फलेक्स यावर खर्च न करता गरजुंना शालेय साहित्यांचे वाटप करून वृक्षारोपणावर भर द्यावा-बिपीनदादा कोल्हे यांचे वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांना आवाहन
June 17, 2023
0
अनेक वर्षांपासून आपण २१ जुन रोजी स्वतःच्या वाढदिवसाला हार, तुरे, शाल, श्रीफळ सत्कार न स्विकारता त्या खर्चातील रक्कमेतून गोर गरीब हुशार होतकरू गरजवंत मुलांना मोफत वहयांसह शालेय साहित्याचे वाटप करत असतो तेंव्हा याही वर्षी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवुन आपल्या वाढदिवसाला कुठलेही फलेक्स, जाहिरात बोर्ड न लावता सत्काराला फाटा देवून हार, तुरे, शाल श्रीफळ न आणता त्या खर्चातुन गोर गरीब मुलांना शालेय साहित्य वाटावे, कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात वसुंधरेची जोपासना करून जास्तीत जास्त वृक्ष लागवडीवर भर द्यावा असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे. बिपीनदादा कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, भरपूर पाउस पडू दे आणि बळीराजा सुखी होवु दे एव्हढच आपलं मागणं पांडुरंगाच्या चरणी आहे. समाजात बहुसंख्य गोर गरीब घटकांसह मध्यमवर्गीयांना दैनंदिन विविध अडचणी भेडसावत असतात, त्यातच गेल्या तीन वर्षापासुन कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात आर्थीक अडचणी निर्माण झाल्या. काही कुटूंबांचे आधारस्तंभ हरपले आहेत, बिपरजॉय वादळामुळे शेतक-यांसमोर चालु खरीप हंगामात अनेक प्रश्न निर्माण होवुन पाउस सुरू न झाल्याने प्रत्येक जण आकाशाकडे टक लावून बसला आहे. तेंव्हा अशा परिस्थितीत आपल्या वाढदिवसावर खर्च न करता कार्यकत्यांनी वृक्ष संवर्धन मोहिम हाती घेवुन सामाजिक लोकोपयोगी कामांना प्रधान्य द्यावे त्यादृष्टीने नियोजन करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.