Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कर्मवीर काळे कारखान्याचे ऊस पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा - आ.आशुतोष काळे


  कोपरगाव:-कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२२/२३ मध्ये गाळप केलेल्या ऊसाचे प्र.मे. टन रुपये २२५ प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२/२३ मध्ये एकूण ५,२४,९४७ मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. इतर कारखान्यांना कराराने २७,९५९ मे. टन ऊस पुरवठा करून या गळीत हंगामात अशा एकूण ५,५२,९०७ मे. टन ऊसास यापूर्वी पहिले पेमेंट २५०० प्रमाणे ऊस गाळपासाठी आल्यानंतर पंधरा दिवसाचे आत शेतकऱ्यांना अदा केले आहे.शेतकरी आज रोजी अडचणीत आहे.कांद्याला भाव नाही.बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा चाळीत सडू लागला आहे. कापूस व सोयाबीनचे दर देखील कमी झालेले आहे.केवळ ऊस पिकालाच एफ.आर.पी.प्रमाणे हमीभाव मिळतो.त्यामुळे खरीप हंगामात बी-बियाणे,रासायनिक खते इत्यादीसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे.खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिके उभी करण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाचा विचार करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती मे.टन रुपये २२५/- प्रमाणे ऊस पेमेंट देण्याचा निर्णय घेवून सदरचे पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले असून पहिले पेमेंट रुपये २,५००/- व हे २२५/- असे एकूण २,७२५/- रुपये प्रती मे.टन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.