राज्यात अनेक दिवसांपासून तलाठी भरती कधी सुरु होतेय याची वाट अनेक परीक्षार्थी बघत होते काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून या संदर्भात जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली होती या जाहिरातीमध्ये पदभरती, राज्यामधील अनेक जिल्ह्यातील तलाठी पदांच्या रिक्त जागा , परीक्षेची अंदाजित दिनांक प्रसिद्ध करण्यात आले होते परंतु अर्ज भरण्यास सुरुवात कधी होईल हे त्यात नमूद केलेले नव्हते.आता अर्ज भरण्याची दिनांक जाहीर झाली असून दि. २६ जून २०२३ पासून तलाठी भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात होणार आहे. हा अर्ज भरण्याची शेवटची दिनांक १७ जुलै २०२३ आहे. जाहिरात वाचण्यासाठी व पदभरती संदर्भातील रिक्त पदे बघण्यासाठी राज्य शासनाच्या वेबसाईट वर जाऊन आपण सविस्तर माहिती मिळवू शकता.