माथेरान -महाराष्ट्राला निसर्गाने अगदी भरभरून दिले असून महाराष्ट्राचा बराचसा भाग डोंगररांगांनी वेढलेला असून या ठिकाणी अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि सौंदर्याने ओतप्रोत असे पर्यटन स्थळे आहेत.बरेच फिरण्यासाठी उत्सुक असलेले पर्यटक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देतात. प्रामुख्याने उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अनेक व्यक्ती कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत कुठे बाहेर फिरायला जायचा प्लान आखतात.जर आपण पावसाळ्याचा विचार केला तर या ऋतूमध्ये बरेच जण हिल स्टेशनला फिरायला जाण्याचा प्लान करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक हिल स्टेशन असून त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.यातील आपण महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीमध्ये वसलेले माथेरान या हिल स्टेशनचा विचार केला तर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले असे हिल स्टेशन आहे.महाराष्ट्रातील जे काही प्रमुख हिल स्टेशन आहे त्यापैकी माथेरान एक आहे. जर तुमचा देखील एखाद्या हिल स्टेशनला भेट देण्याचा प्लान असेल तर तुमच्यासाठी माथेरान हे ठिकाण खूप उत्तम ठरू शकते.माथेरान आहे महाराष्ट्रातील टॉप हिल स्टेशन पैकी एक2635 फूट उंचीवर असलेले माथेरान हे महाराष्ट्रातील व भारतातील पश्चिम घाटाच्या सह्याद्री डोंगररागाच्या कुशीत असून एक लहान ऑफ बीट हिल स्टेशन आहे.
पुणे आणि मुंबईकरांसाठी लोकप्रिय असे वीकेंड गेटवे साठी एक चांगला पर्याय असून या ठिकाणी घनदाट जंगले आणि डोंगररांगात वसलेली गावे खूप पाहण्यासारखे आहेत.माथेरानचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे आशिया खंडातील एकमेव असे ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही वाहनाला परवानगी नाही.कारण या ठिकाणचे वातावरण प्रदूषण मुक्त ठेवणे हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे पर्यटकांना माथेरान या ठिकाणी असलेल्या दस्तुरी पॉईंटच्या पुढे वाहन नेण्याला परवानगी नाही. त्यामुळे पर्यटकांना दस्तुरी पॉईंट वरून माथेरानला जाण्यासाठी अडीच किलोमीटरच्या अंतर पायी पार करावे लागते.या ठिकाणची टॉय ट्रेन आहे प्रसिद्ध माथेरानचे आणखी एक अनोख्या वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले टॉय ट्रेन होय. या ट्रेनची सुरुवात 1907 मध्ये करण्यात आली असून ती नेरळ ते माथेरान हे वीस किलोमीटरच्या अंतर घनदाट जंगलातून पार करते.ही महाराष्ट्रातील एकमेव टॉय ट्रेन असून तिला माथेरान लाईट रेल्वे म्हणून देखील ओळखले जाते. या ट्रेनने प्रवास करणे हा आतल्या आत एक फार मोठा संस्मरणीय असा अनुभव आहे.तसेच माथेरानचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन असून हे पश्चिम घाटाच्या डोंगररागेत आठशे मीटर उंचीवर आहे.ब्रिटिश कालावधीमध्ये हे ब्रिटिशांनी ग्रीष्मकालीन रिसॉर्ट अर्थात उन्हाळ्यातील रिसॉर्ट म्हणून विकसित केले होते. तसेच या ठिकाणाचे शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न करते.35 पेक्षा जास्त पॉईंट माथेरानचा जो काही सात किलोमीटरचा परिसर आहे त्या परिसरामध्ये अनेक प्रसिद्ध पॉईंट असून ते पर्यटकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे पेनोरामा पॉईंट,साही पॉईंट, लुईसा पॉईंट, मंकी पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, रामबाग पॉईंट,किंग जॉर्ज पॉईंट, हार्ट पॉइंट इत्यादी 35 पेक्षा जास्त प्रेक्षणीय असे व्ह्यू पॉईंट आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात जर तुमचा हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी माथेरान हे ठिकाण खूप उत्तम ठरू शकते