राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणारी २६ वर्षीय तरुणी दर्शना पवार हिचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दर्शना पवार हिची हत्या की आत्महत्या? असा प्रश्न असतानाच पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे संबधित तरुणीच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी राजगड किल्यावर गुराख्याला एक सडलेला मृतदेह आढळला. गुंजवणे गावचे पोलीस पाटील बाळकृष्ण रसाळ यांनी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.MPSC उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच पोलीस हैराण...
यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं असता मृतदेहाजवळ मोबाइल आणि चप्पल सापडली. त्यावरून तक्रारदार वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालातून तिच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा खून झाल्याचे समोर आ ले एमपीएससी
परीक्षेत यश संपादित केल्यामुळे ९ जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमी या खासगी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दर्शनाचा सत्कार करण्यात येणार होता. हा कार्यक्रम १० तारखेला टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात झाला. मात्र, या कार्यक्रमानंतर तिचा फोन लागला नाही, असे तिच्या पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी १२ जूनला संबंधित संस्थेत चौकशी केली असता, कार्यक्रमानंतर दर्शना तेथून गेल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या वडिलांनी १२ जूनला सिंहगड रोड पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली.
अधिक माहितीनुसार, दर्शना ही सत्कार घेण्यासाठी ९ जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमी इथं आली होती. ११ जून रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत ती आमच्या संपर्कात होती. मात्र, १२ रोजी दर्शनाला आम्ही दिवसभर फोन करत होतो. पण तिने फोन उचलले नाहीत. म्हणून आम्ही स्पॉट लाईट अकॅडमी इथे चौकशीसाठी आलो तेव्हा आम्हाला समजले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र, हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून त्यांनी सिंहगड रोड पोलिसांत मिसिंगची तक्रार दिली असल्याचे दर्शनाच्या वडीलांकडून सांगण्यात आलं होतं.मित्रदेखील गायब दर्शना आणि तिचा मित्र राहुल हे ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर आले होते. मात्र, तिचा मित्र राहुल हा देखील गायब असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही बाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांचा मित्रावर संशय अधिक बळावला आहे.दर्शनाचा खून नक्की कोणी केला? अशात राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला असून दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रेकिंगला गेलेला मित्र घटनेनंतर फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. राहुल हाच मुख्य आरोपी आहे की आणखी त्या तरुणीला कुणी मारले याचा शोध लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.