शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
July 05, 2023
0
अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा असून सद्यस्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजासाठी नागरिकांना अहमदनगर येथील जिल्हा मुख्यालयाशी जाणे भाग पडत असत त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण निर्माण होत असे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने नागरिकांची अडचण विचारात घेता तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे स्वतंत्र अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्यावर त्यावर दिनांक १३/०६/२०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होऊन त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली त्यानुसार सदर कार्यालयामध्ये ०६ पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिली असून सदरच्या कार्यालयामध्ये अप्पर जिल्हाधिकारी (१) नायब तहसीलदार (१) लघुलेखक (१) अव्वल कारकून (१) लिपिक टंकलेखक (२) अशा (०६) पदांसाठी मंजुरी देण्यात आली असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी यांच्याकडे कोपरगाव तालुका राहता तालुका श्रीरामपूर तालुका संगमनेर तालुका अकोला तालुका व राहुरी तालुका अशा ६ तालुक्यांचा कारभार या ठिकाणाहून चालणार आहे तसेच या कार्यक्षेत्रातील तालुके त्याअंतर्गत महसूल मंडळे तलाठी सांझे व त्या मध्ये अंतर्भूत होणाऱ्या गावांची यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सध्या जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या स्तरावर सुरू आहे तसेच अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी यांच्या प्रतिवेदन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अहमदनगर आणि नियंत्रण अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक हे काम पाहणार आहे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चा कलम १३ पोट कलम (३) अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्ती अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी यांना त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रापुरत्या प्रदान करण्याबाबत स्वतंत्रपणे अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव संतोष. वि.गावडे यांच्या सहीने निर्गमित करण्यात आले आहे.