Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सैन्यदलातील हवालदार दिपक आहेर यांच्यावर लष्करी इतमामातअंत्यसंस्कार


 भारतीय सैन्यदलातील २५३ मेडिअम रेजिमेंटचे हवालदार दिपक कृष्णा आहेर (वय - ४१) यांचे ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ४:१५ मी. कमांड हाॅस्पिटल, पुणे येथे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी वैकुंठ भुमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कोळपेवाडी व सुरेगाव ग्रामस्थांनी आपली दुकाने व्यवसाय बंद ठेवून अंत्यसंस्कारा मध्ये सहभागी झाले महाराष्ट्र पोलीस दल व भारतीय लष्कराच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फेर्या झाडून बिगुल वाजवत हवालदार दिपक आहेर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली यावेळी "मेजर दिपक आहेर अमर रहे",अमर रहे "भारत माता की जय" च्या घोषणाना देतांना उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. रविवारी सकाळी दिपक यांच्या निधनाची बातमी कळताच आहेर कुटुंबा बरोबर कोळपेवाडी ग्रांमस्थाना शोक अनावर झाला २००० साली सैन्य दलात दाखल होवून २३ वर्षे देश सेवा बजावत निव्रुत्तीस काही दिवस शिल्लक असतांना वयाच्या ४१ व्या वर्षी कमांड हाॅस्पिटल, पुणे येथे उपचारा दरम्यान निधन झाले. पुणे येथून कोळपेवाडी शिवेवर पार्थिव दाखल झाल्या नंतर माजी सैनिक दलाच्या वतीने खांदा देवुन दिपक यांचे पार्थिव लष्कराच्या फूलांनी सजवलेल्या ट्रक मध्ये ठेवण्यात आले ट्रक पुढे ऐ मेरे वतन कें लोगो..."हे गीत लाऊडस्पीकरवर वाजत होते रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी  दिपक यांना मानवंदना देत अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती बाजार तळावर उभारलेल्या मंडपात दिपक यांचे पार्थिव नागरिकांना अंत्य दर्शनासाठी ठेवले होते.भारतीय सैन्यदलाच्या वतीने नायब सुभेदार शामसुंदर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोपरगांवचे तहसिलदार संदिपकुमार भोसले,माजी आमदार अशोक काळे,जिल्हा माजी सैनिक कल्याण बोर्डा च्या वतीने सुभेदार धन्यकुमार सरवदे,सुभेदार यमाजी चेहडे,कोपरगांव तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे, कोपरगांव तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष युवराज गांगवे,सुभेदार मारुती कोपरे,  संदिप कोळपकर,स्वच्छतादूत सुशांत घोडके संरपच सुर्यभान कोळपे शंशिकांत वाबळे निव्रुत्ती कोळपे आदिनी पुष्पचक्र अर्पण केले यावेळी अनेक मान्य वरांनी श्रध्दाजंली अर्पन केली हवालदार दिपक यांचे पार्थिवावर ठेवण्यात आलेला राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज पत्नी कांचन यांचेकडे सुपुर्द करण्यात आला मुलगा साहिल याने हवालदार दिपक यांचे पार्थिवाला अग्नी दिला सुत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.