कोपरगांव येथील इंदिरापथ भागातील 20 वर्षीय युवतीस प्रेमाच्या जाळयात ओढून तिची फसवणुक केली तिला व तिचे घरच्यांना जिवेमारण्याची धमकी देवून तीस खडकी येथील मदरशात बळजबरीने नेवून चौघांनी तिचेवर अतिप्रसंग केला तिच्या मर्जीविरोधात शरीरसंबंध करुन त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करण्यात आले व त्या आघारे सदर युवतीस ब्लॅकमेल करुन इंदौर येथे बोलावून अनिच्छेने तिच्यावर अतिप्रसंग केला व बळजबरीने धर्मांतर करुन तिचेकडून नमाज पठण केल्या प्रकरणी कोपरगांव शहर पोलीस स्टेशनला इंदौरच्या मौलवीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
या संबंधी इंदिरापथ कोपरगांव येथील 20 वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन सायम कुरेशी रा.जुना पिठा इंदौर मध्यप्रदेश, इमरान अयुब शेख रा.कोपरगांव,छोटू उर्फ कलिम (पूर्ण नांव माहित नाही)फय्याज (पूर्ण नांव माहित नाही दोघे रा.कोपरगांव व इंदौर येथील मौलवी पूर्ण नांव माहिती नाही अशा पाच जणांवर दिलेल्या फिर्यादीत म्हटले की आरोपी सायम कुरेशी याने तीन वर्षापूर्वी मो.नं. 7724900196 वरुन फिर्यादीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले त्यानंतर एक वर्षाने तिस प्रेमाच्या जाळयात फसवून दि 21/5/2023 रोजी सकाळी 6 ते 12 वा. दरम्यान आरोपी सायम कुरेशी याने फिर्यादी व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यांनी त्यास विरोध केला असता वरील आरोपींपैकी नं.1 ते 4 यांनी संगनमताने फिर्यादीचे हातपाय धरुन तिचे मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तिला बळजबरीने तिच्याच मोटर सायकलवर ट्रिपल सिट बसून खडकी जवळील मदरशात घेवून गेले व आरोपी सायम याने तिचेवर बळजबरीने शरीरसंबंध केले त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करुन हे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करील अशी धमकी देवून फिर्यादीस इंदौर येथे बोलावून घेतले तेथे देखील एका घरात आरोपी सायम याने फिर्यादीशी बळजबरीने शरीर संभेग केला व इंदौर येथील एका मौलवी कडून बळजबरीने फिर्यादीस नमाज पठण करण्यास लावले तसेच धर्मांतरासाठी व आरोपी सायम बरोबर लग्न करण्यासाठी दबाव आणला वेळोवेळी फिर्यादीचे आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली आहे सदर गुन्हयातील दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती तपासी अधिकारी पो.स.र्इ भरत दाते यांनी दिली