दिनांक ०७ जुलै २०२३ रोजी दुपारी शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरात आल्यानंतर प्रथम त्यांनी द्वारकामाईचे दर्शन घेतले तसेच समाधी मंदिर दर्शनानंतर गुरुस्थान मंदिराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला प्रदक्षिणा घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी साईबाबां
ची पाद्यपूजा आणि आरती केली यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबांची मूर्ती व शाल देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सत्कार करण्यात आला यानंतर साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या व त्यांनी वापरलेल्या वस्तू कपडे पादत्राणे रथ पालखी तसेच श्री साईबाबांच्या ओरिजनल प्रतिमा जतन करून संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत त्या संग्रहालयाला भेट देऊन तेथे असलेल्या वस्तूंची संपूर्ण माहिती श्री साईबाबा संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवाशंकर यांनी संग्रहालयातील वस्तूंन बाबत सविस्तर माहिती राष्ट्रपती महोदयांना दिली यानंतर प्रसादालाकडे जात असताना साई मंदिराच्या १ नंबर गेट समोर राष्ट्रपती महोदयांना बघण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती यावेळी राष्ट्रपती महोदयांनी गाडी थांबवून गाडीतून उतरून थोडं पायी चालत उपस्थित साई भक्तांना व नागरिकांना अभिवादन केले तसेच उपस्थित साई भक्तांनी व नागरिकांनी जय साईराम वंदे मातरमच्या घोषणा देत राष्ट्रपतींच्या या साधेपणाचे सर्वांनी कौतुक केले त्यानंतर पुढे प्रसादाल्यकडे रवाना झाल्या त्यानंतर प्रसादालयात भोजनासाठी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने खास महाराष्ट्रीयन पद्धतीची खास थाळी तयार करण्यात आली होती यामध्ये मटकीची उसळ, मेथीची भाजी, पिठले वडी, त्याचबरोबर भजे, पाव, पापड, लोणचं व शेंगदाण्याची चटणी बनवली होती यामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली शेंगदाण्याची चटणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवडली त्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी ही चटणी कशी बनवली जाते याबाबत श्री साईबाबा संस्थानच्या आचार्यांकडून याबाबत सखोल माहिती घेतली त्यानंतर प्रसादाल्ययातून बाहेर निघत असताना राष्ट्रपती महोदयांनी साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांना रोज शिर्डी साईबाबा संस्थानच्या भोजनगृहात दररोज किती साई भक्तांना जेवण देतात याबाबतची माहिती घेतली त्यानंतर राष्ट्रपती महोदयांनी प्रसादाच्या गुणवत्तेचे आणि व्यवस्थेचे यावेळी कौतुक केले याबरोबरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या झारखंडच्या राज्यपाल असताना यापूर्वी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या त्यानंतर आता भारताच्या राष्ट्रपती झाल्यानंतर त्या पुन्हा श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विशेष विमानाने पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या राष्ट्रपती महोदया शिर्डीला येणार म्हणून शिर्डी मध्ये पोलिसांचा मोठा कडे कोट बंदोबस्त लावण्यात आला होता यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पंधराशे पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश या बंदोबस्त दौऱ्या दरम्यान शिर्डी शहरात लावण्यात आला होता तसेच या बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपमहासंचालक पोलीस महानिरीक्षक अशा अधिकाऱ्यांसह पोलीसांच्या विविध विभागातील अधिकारी यांच्यासह राज्य सरकारचे विविध खात्याचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.