कोपरगाव शहरातील येवला रोड येथील हॉटेल कल्पतरू या हॉटेलवर शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी त्यांच्या पथकासह शुक्रवार दिनांक.११ ऑगस्ट २०२३ रोजी कोपरगाव येथील हॉटेल कल्पतरू येथे सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे याबाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन ०२ पिडीत परप्रांतीय मुलीची सुटका करण्यात आली असून तिथे असलेल्या विजय मवाळ या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या कारवाईमुळे कोपरगाव शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. सदरची कारवाई अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला ॲडिशनल पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, हेडकॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस नाईक कृष्णा कुऱ्हे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे , पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल धराडे, हेडकॉन्स्टेबल आप्पासाहेब थोरमिसे यांनी सदरची कारवाई केली.