सोनाळा : सातपुड्यात किर्रर झाडी झुडपी, हिंस्त्र पशुपक्षी असा उंच टेकडया दऱ्याखोऱ्या असलेला अंबाबरवा व्याघ्र अभयारण्य आहे मानवी वस्तीपासून कोसोदूर मध्यप्रदेशला लागून वन्यजीव विभागाचे हे कोअर क्षेत्र आहे. अंबाबरवा हे समुद्र सपाटी पासून ८३० मीटर उंच दुर्गम जंगल आहे. या क्षेत्रात वन्यजीव विभागाच्या जॉबाज महिला वनरक्षक सेवा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घर घर तिरंगा अभियान गतवर्षी पासून सुरू केले आहे. त्यामूळे दुर्गम व अतिसंरक्षित सातपुडा जंगलात पण तिरंगा मोठ्या डौलात फडकला आहे. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या जिजाऊंच्या लेकी ५ महिला वनरक्षक यांनी मेरी जान तिरंगा, मेरी आण तिरंगा म्हणत अंबाबरवा, गरमपाणी, करमोडा, मांगेरी इत्यादी ५ संरक्षक कॅम्प वर तिरंगा फडकविला आहे.
दुर्गम भागात तिरंगा फडकत असल्याने आता घर घर तिरंगा अभियानाला चार चाँदलागले आहे. पुरुष कर्मचाऱ्यांसमवेत अंबाबरवा अभयारण्यात दुर्गम भागात जिद्दीने ५ महिला वनरक्षक सेवा देत आहेत . १३ आगष्ट पासून सुरु झालेल्या घर घर तिरंगा अभियानानुसार सोनाळा वनपरिक्षेत्रातील अंबाबरवा अभयारण्यात दुर्गम कॅम्पवर शासकीय नियमानुसार तिरंगा फडकविण्यात आला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल वाकोडे यांच्या नेतृत्वात सक्रीय सहभागाने महिलांना प्रथमच तिरंगा जबाबदारी सोपवित त्या महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. अंबाबरवा हे बसाली गेट पासून १३ किमी आहे. हे क्षेत्र बंदरझिरा मनिराम नाका यानंतर अंबाबरवा आहे. येथे महिला वनरक्षक कु. रुपाली राऊत यांनी ध्वजारोहणकेले. येथे अजाबराव पवार बेठेकर हे वनरक्षक व ८ वन मजूर निवासी उपस्थित आहेत. तर गरमपाणी कॅम्प वर राणी गरुड ममता बेठेकर यांनी वनमजूरासह तिरंगा फडकविला. करमोडा कॅम्पवर लीना जामूनकर यांनी तर मांगेरी कॅम्पवर उज्वला सलामे यांनी तिरंगा डौलात फडकवून झेंड्याला सलामी दिली. 'नाज तुमपे करे, ये जमी ये आसमां देते है ये दुआ ताकी जिता रहे अपना हिंदुस्थान' याप्रमाणे त्या ५ जॉबाज वनकन्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंबाबरवा व्याघ्र अभयारण्य येथे कार्यरत महिला वनरक्षक यांना घर घर तिरंगा अभियानांतर्गत सन्मान देत तिरंगा फडकविण्याची जबाबदारी दिली आहे. दुर्गम भागात तिरंगा फडकविणाऱ्या वनकन्यांचा सार्थ अभिमान आहे.- सुनील वाकोडे, आरएफओ अंबाबरवा अभयारण्य रेंज,सोनाळा