पालघर
युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्बूसवर पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील डॉ. सीमा पाटील यांनी यशस्वी चढाई केली. स्वातंत्र्यदिनी सकाळी साडेसहा वाजता हाती तिरंगा आणि छत्रपतींची राजमुद्रा घेऊन त्या शिखरावर पोहोचल्या. पराक्रमानंतर त्यांनी नऊवारी व फेटा या मराठमोळ्या पारंपरिक वेशात राष्ट्रध्वज हाती घेऊन जाज्वल्य राष्ट्रभक्ती व मराठी अस्मितेचे दर्शन घडवले.
३६० एक्सप्लोररमार्फत दोन वेळा एल्ब्रूस सर करणारे आनंद बनसोडे यांनी या मोहिमेचे नियोजन केले होते. त्यांच्यासह त्यांनी एव्हरेस्ट बेसकॅम्प, माउंट किलीमांजारो, अकाँकॅगुआ या शिखरांवर यशस्वी मोहिमा केल्या आहेत. ट्रेनर जिमी मेहेरशाही यांनी या मोहिमेसाठी वर्षभर मेहनत करून कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे- वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांना गिर्यारोहणाचा छंद आहे.गिर्यारोहक डॉ. सीमा पाटील यांना शिखरावर यशस्वी चढाईसाठी साडेपाच तासांचा अवधी लागला. त्या ४० वर्षीय असून त्यांना दोन मुले आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या हिरकणीने सातासमुद्रापार घेतली.