Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महिला बचत गट देणार तुम्हाला रेशन

                

                            पुरवठा विभाग : रिक्त स्वस्त धान्य दुकानांचे वाटप

 अहमदनगर सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत आता रिक्त असलेल्या स्वस्त धान्य दुकानांचे वाटप महिला बचतगटांना होणार आहे. त्यासाठीचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, महिला बचतगटांना अर्ज सादर करावा लागणार आहे.जिल्ह्यात १० लाख १५ हजार रेशन कार्डधारक आहेत. या रेशन कार्डधारकांसाठी १८८७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. सद्य:स्थितीत त्यातील १६३ दुकाने रिक्त आहेत. म्हणजे तेथे दुकानदार नेमलेले नाहीत. रिक्त दुकाने दुसऱ्या दुकानांना जोडलेली आहेत. अशी रिक्त दुकाने आता प्राधान्याने महिला बचत गटांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत.त्यासाठी पुरवठा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यानुसार इच्छुक महिला बचत गटांनी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करायचे आहेत.

                                                    नवीन कार्डधारक मिळावेत...

नवीन दुकाने सुरु करण्याऐवजी कमी कार्ड असलेल्या दुकानदारांना नवीन कार्डधारक उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे कार्डधारकांना धान्य मिळेल आणि यातून संबंधित रेशन दुकाने सक्षम होती. केवळ नवीन दुकाने सुरु करून उपयोग नाही. प्रत्येक दुकान सक्षमपणे चालवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, त्यासाठी रेशन कार्ड वाढवणे, रेशन दुकानांमधून इतर वस्तू धान्य विक्रीसाठी परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी रेशन दुकानदारांकडून व्यक्त होत आहे.

                                    विभागाने जिल्ह्यात १८८७ रेशन दुकाने

जिल्ह्यात १० लाख १५ हजार रेशन कार्डधारक आहेत. या रेशन कार्डधारकांसाठी १८८७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. सद्य:स्थितीत त्यातील १६३ दुकाने रिक्त आहेत. ग्रामीण भागात एका गावात एकच धान्य दुकान आहे.

                                                    बचत गटांना देणार प्राधान्य

रेशन धान्य महिला बचत गटांना देण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित महिला बचतगटांना संबंधित तहसील कार्यालयात ३० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.


रिक्त धान्य दुकाने जिल्ह्यातील महिला बचतगटांना देण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत सुरु करण्यात आली आहे. संबंधित महिला बचत गटांनी ३० ऑगस्टपर्यंत तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जामधून निकषांची पूर्तता करणाऱ्या महिला बचत गटांची स्वस्त धान्य दुकानांसाठी निवड करण्यात येईल.- हेमलता बडे, जिल्हा पुरवठा अधिकारी


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.