Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विश्वसुंदरी कॅरोलिना आणि भारत सुंदरी सिनी शेट्टी यांची ससून रुग्णालयाला भेट

 पुणेः विश्वसुंदरी कॅरोलिना बिएलवेल्स्का, भारत सुंदरी सिनी शेट्टी यांनी बुधवारी ससून रुग्णालयाला भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नवजात बालक अतिदक्षता विभागाची पाहणी केली. त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गर्दी झाली होती.

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी विश्वसुंदरी आणि भारत सुंदरी यांनी ससून रुग्णालयाला दिलेल्या भेटीबाबत माहिती दिली. मुकुल माधव फाउंडेशनने ससून रुग्णालयात नवजात बालक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) उभारण्यास मदत केली आहे. या विभागाची पाहणी करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया या विश्वसुंदरी कॅरोलिना बाएवेल्स्का, भारत सुंदरी सिनी शेट्टी यांना घेऊन ससून रुग्णालयात आल्या होत्या. त्यांच्यासमवेत या विश्वसुंदरी स्पर्धेच्या संयोजन समितीच्या अध्यक्षा ज्युलिया मोरली याही होत्या. त्यांनी या विभागाची पाहणी करून ससून रुग्णालयातील या सुविधेचे कौतुक केले, असे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.