दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे श्री साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेत पाद्यपूजा व आरती केली. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा श्री साईबाबा यांची मूर्ती भेट देऊन सन्मान केला