नागपूर : विदेशातून येणाऱ्या विमानातून नागपुरात तस्कारीचे सोने आणि ड्रग्स येत असल्याचे अनेकदा उघडीस आले आहे. मागील शुक्रवारी शारजाहून नागपूरला आलेल्या एका विमान प्रवाशाकडून ३४० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते. आता लाखो रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. दुबईहून आलेल्या एका तरुणाडून ड्रग्सची तीन पॉकीट जप्त करण्यात आली.
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)ने रविवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास ही कारवाई केली. तपास यंत्रणांना याबाबत पूर्वीच माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी नागपूर विमानतळावर रविवारी रात्रीपासूनच पाळत ठेवली होती. पहाटे ४.१० वाजता विमान नागपुरात उतरले. स्नॅकिंग दरम्यान, सीमाशुल्क आणि डीआरआयला एक लोखंडी वस्तू दिसली. लोखंडाच्या वाहतुकीवर निर्बंध नाही. त्यांना संशय आला. अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. मोटर पंप असल्याचे आरोपी व्यक्ती सांगत होता. अधिकाऱ्यांनी हातोड्याने मोटारपंप फोडला असता, त्यातून तीन ड्रग्सची पाकिट निघाली. या ड्रग्सची किंमत बाजारात लाखाच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.