संगमनेर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) कुलपती म्हणजेच राज्यपाल व प्रति- कुलपतींनी विविध सदस्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या. यात एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटरच्या अधिष्ठाता (डीन) डॉ. मीनल मोहगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
डॉ. मोहगांवकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथून एमबीबीएस पदवी आणि एमडी क्षकिरणशास्त्र पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. गत ३० वर्षांपासून त्या त्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१५ साली त्या एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे क्ष-किरणशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी २७ एप्रिल २०२० पासून अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारला. कोरोना काळात त्यांनी डीन पदाचा कार्यभार स्वीकारला.