अमरावती रक्षाबंधन साजरे करण्यासाठी मध्य प्रदेशातील भैसदही तालुक्यातील गावाकडे निघालेल्या भावाच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्याच्यासह त्याची बहीणदेखील घटनास्थळीच दगावली. वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिराळा गावालगतच्या पेट्रोलपंपाजवळ बुधवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मृत बहीण रक्षाबंधनासाठी भावासोबत माहेरी जात होती. वलगाव पोलिसांनसार, रिना गणेश ताडीर (3५ रा. आनंदवाडी, कठोरा रोड, अमरावती) व नारायण देवानंद जावरकर (२७, रा. सुपाडा, ता. भैसदही, मध्यप्रदेश) अशी मतांची नावे आहेत. नारायण जावरकर हा रक्षाबंधनाच्या निमित्ताने बुधवारी अमरावतीत राहणाऱ्या बहिणीकडे आला होता. बुधवारी दुपारी २:३० च्या समारास भोजन करून नारायण हा बहिणीसह दुचाकीने चांदूर बाजारकडे घोषित केले.
चांदर बाजारहून येत असलेल्या एम.एच. २९ एडी ४३३० या कारने त्याच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात दोघेही बहीण-भाऊ घटनास्थळीच दगावले. चालकासह कारमधील तिघेदेखील जखमी झाले, तर दोन्ही वाहने चेंदामेंदा झाली. अपघाताची माहिती वलगाव पोलिसांना देण्यात आली. काही प्रत्यक्षदर्शीनी रक्तबंबाळ स्थितीतील बहीण-भावाला चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात शिराळानजिक झालेल्या भीषण अपघातात दुचाकी व कारचा असा चेंदामेंदा झाला. कार शिवारात जाऊन उलटली तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर वलगावचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तथा कारचालकाविरुद्ध गन्हा दाखल केला.