चांद्रयान ३ मोहिम आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. २० ऑगस्ट म्हणजेच रविवारी पहाटे चांद्रयान ३ ने आणखी कक्षा कमी केली असून आता ते चंद्राभोवती अगरदी जवळने म्हणजे २५ बाय १३४ किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावरुन चांद्रयान ३ चा प्रवास सुरु झाला आहे.
२३ ऑगस्टला चांद्रयान ३ हे चंद्रावर उतरणार असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने याआधीच जाहिर केलं होतं. पण नेमकी वेळ सांगितली नव्हती. आज कक्षेत शेवटचा बदल केल्यावर इस्रोने हे नेमकी वेळ सांगितली आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी चांद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर दक्षिण भागात अलगद उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.