शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख व सहायक प्राध्यापक प्रा. डॉ. शीतल अरविंद धरम- लांडगे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इतिहास विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. साम्यवादी चळवळ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे.
प्रा. डॉ. शीतल धरम या दिवंगत अरविंद गोपीनाथ धरम यांच्या कन्या व बँक ऑफ महाराष्ट्र वेरूळ शाखेतील मॅनेजर सागर मोहन लांडगे यांच्या पत्नी आहे. प्रा. डॉ. शीतल धरम यांनी इतिहास विषयात एम. ए., सेट, नेट या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. धरम यांनी पीएच.डी. संशोधनासाठी 'अहमदनगर जिल्ह्यातील कम्युनिस्ट चळवळ : स्वातंत्र्योत्तर इ.स. १९४७ ते १९९०' हा विषय निवडला होता. त्यांच्या या संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून शेवगाव तालुक्यातील आबासाहेब काकडे कला महाविद्यालय बोधेगाव येथील प्राचार्य डॉ. मच्छिंद्र फसले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.