संगमनेर शिक्षण क्षेत्रात नवनवीन : प्रयोग आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेले शिक्षण, प्रशिक्षण देऊन उत्तम शिक्षक तयार करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून डॉ. डेरे इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड कनिष्ठ महाविद्यालयात बालवाडी शिक्षकांसाठी 'अर्ली चाईल्ड केअर अॅण्ड एज्युकेशन अंतर्गत मॉन्टेसरी टिचर ट्रेनिंग कोर्स' घेण्यात आला. यात बालवाडी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात यश संपादन केलेल्या शिक्षकांचा शिक्षक दिनी संस्थेच्या संचालिका अंकिता श्रीराज डेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यातआला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. भानुदास डेरे, उपाध्यक्ष अॅड. श्रीराज भानुदास डेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी, मुख्याध्यापिका पवार, उपमुख्याध्यापिका स्मिता गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.
लहान मुलांची उत्तम जडणघडण होण्यासाठी आणि सर्वांगीण विकास होण्यासाठीच्या उपक्रमांची तयारी आणि नवीन शैक्षणिक धोरण शाळेत सुरू करणे, असा या प्रशिक्षणाचा हेतू आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बालवाडी विद्यार्थ्यांकरिता शाळेत नवीन राष्ट्रीय धोरणानुसार उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांनी सुरुवात केली आहे.