Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऐन शिक्षक दिन कार्यक्रमातच शिक्षिकेने घेतला शेवटचा श्वास


जामखेड : आष्टी (जि. बीड) येथील अनिशा ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच मंगळवारी दुपारी बारा वाजता खुर्चीवर बसलेल्या शिक्षिका सुनीता गायकवाड (वय ४८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मयत गायकवाड या जामखेड येथील रहिवासी आहेत. जामखेड नगरपरिषदमध्ये पर्यवेक्षक असलेले राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी होत. गायकवाड या आष्टी येथील अनिशा ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. मंगळवारी बाराच्या सुमारास शिक्षक दिनानिमित्त शाळेत कार्यक्रम सुरू होता. याचवेळी गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका आला व त्या खुर्चीवरून खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा जामखेड शहरातील तपनेश्वर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.