अहमदनगर : नासा सायन्स अँड रिसर्च सेंटरमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाइन स्पर्धेत येथील रेसिडेन्शिअल हायस्कूलची अनुष्का अशोक विद्यार्थिनी अकोलकर हिची सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. निवड होणारी ती जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. २६ ऑगस्ट रोजी ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या एकूण ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सिंगापूर आणि नासा (अमेरिका) या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी क्षेत्रभेट घडवली जाणार आहे. यासाठी देशभरातून ७० विद्यार्थ्यांची निवड होणार होती. त्यामध्ये महाराष्ट्रातून बारा विद्यार्थ्यांची निवड सिंगापूर येथील रिसर्च सेंटरमध्ये व बारा विद्यार्थ्यांची निवड नासा सेंटरसाठी (अमेरिका) झाली.
या परीक्षेत जिल्ह्यातून रेसिडेन्शिअलची केवळ अनुष्का हिची निवड झाली आहे. यासाठी तिला विद्यालयाचे शिक्षक व्ही. एस. पंडित यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे, तसेच इतर शिक्षकांनी अभिनंदन केलेआहे.