आता धनगर आरक्षणासाठी 'चोंडी'त एल्गार
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलक आक्रमक असतानाच आता धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटला आहे. यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी (दि.६) सकाळपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी जामखेड) येथे (ता. जामखेड) स्मारकस्थळी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी. प्रवर्ग) आरक्षण मिळावे यासाठी वटहुकूम काढावा, अशी मागणी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी केली आहे.
धनगर समाज मागील सत्तर वर्षांपासून राज्यघटनेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहेअनेकदा आंदोलनेही झालेली आहेत. प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जाहीर भूमिका घेतात. मात्र, आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात काहीच कृती होत नाही. यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आता १८ ते २२ सप्टेंबरला संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण अंमलबजावणीचा वटहुकूम काढला जावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा,
या मागणीसाठी आम्ही बी. के. कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन सुरू केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी स्मारकस्थळी कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसले आहेत, असे दोडतल यांनी सांगितले. आंदोलना अहिल्यादेवी होळकर यांचे मूळ वंशज अक्षय शिंदे, बाळासाहेब दोलतड़े माणिकराव दांगडे, अण्णासाहे रूपनवर, गोविंद नरवटे, सुरेश बंडगर समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळा गायके, नंदू खरात ज्ञानदेव ढवळे सहभागी झाले आहेत