वर्धा: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या ( एन.सी. इ.आर.टी. ) इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात ‘अ होमेज टू अवर ब्रेव्ह सोल्जर’ (A Homage to our Brave Soldiers) हा धडा समाविष्ट करण्यात आला आहेसंरक्षण व शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे सुरू केलेल्या या उपक्रमात हा राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील धडा आहे. यामागे शालेय मुलांचा राष्ट्र उभारणीत सहभाग वाढविण्याचा हेतू असल्याचे सांगितल्या जाते. तसेच मुलांमध्ये देशभक्ती, कर्तव्यनिष्ठता, धैर्य, त्याग ही मूल्ये रुजविण्याचा हेतू आहे. या धड्यात राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा इतिहास, महत्त्व व संकल्पना याची माहिती देण्यात आली आहे.तसेच सशस्त्र दलातील शूरविरांनी स्वातंत्र्यानंतर देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची माहिती आहे. धड्यात दोन मित्र एकमेकांना पत्र लिहून बलिदानाची माहिती सांगत असल्याचे स्वरूप आहे.