अहमदनगर : फेडरेशनमार्फत बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या सभासद बँकांना 'सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारानेसन्मानित केले जाते. येथील दि अंबिका महिला सहकारी बँकेला दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि. मुंबई यांचा राज्यातील महिला बँक गटातून प्रथम क्रमांकाचा 'सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे.या पुरस्काराने बँकेची उंची पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तसेच बँकेला यापूर्वीही याच प्रकारचे राज्यस्तरीय नऊ आणि राष्ट्रीय स्तरावरील एक पुरस्कार प्राप्त आहेत. अहमदनगर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन यांच्याकडूनही नक्त एन. पी. ए. प्रमाण शून्य टक्के राखल्याबद्दल बँकेचा सन्मान करून गौरव करण्यात आला असल्याचे बँकेच्या अध्यक्ष अॅड. शारदा लगड यांनी सांगितले. बँकेच्या संस्थापिका प्रा. मेधाताई काळे म्हणाल्या, यावर्षी बँकेने मोबाइल बँकिंग सेवा सुरू केली आहे. तसेच बँकेची बोल्हेगाव नवनागापूर येथील नवीन शाखा लवकरच ग्राहकांच्या सेवेत कार्यरत होत आहे.
बँकेच्या या यशाबद्दल अध्यक्ष अॅड. लगड यांनी बँकेचे सभासद, ग्राहक, संचालक प्रा. पुष्पा मरकड, प्रा. डॉ. संध्या जाधव, आशा मिस्कीन, प्रा. पुष्पलता वाघ, डॉ. क्रांती अनभुले, सुमन गोसावी, शांता मोरे, भारती आठरे, सरोजिनी चव्हाण, सविता गांगर्डे, अॅड. विजया काकडे, शोभा खरपुडे, तज्ज्ञ संचालक सी. ए. ज्ञानेश्वर काळे, रमेश परभाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अंकुश गायकवाड, उपमुख्याधिकारी विजया पाटील, वरिष्ठ अधिकारी अजित लोंढे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.