नाशिक: जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील नळकस येथे रिंकु देवरे (२५) या महेश सावंत यांच्या शेतातील विहिरीत पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या.पाणी भरताना त्यांचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत नांदगाव तालुक्यातील धोटाणे येथे साळुबाई सोनवणे (५५) गावातील विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. मात्र पाय घसरल्याने तोल जाऊन त्या विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.