नवी दिल्ली: भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी मनीष देसाई यांची बुधवारी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या प्रधान महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देसाई (१९८९ बॅच) हे सरकारचे प्रमुख प्रवक्ते असतील. ते गुरुवारी निवृत्त होत असलेल्या राजेश मल्होत्रा यांच्याकडून पदभार स्वीकारतील. त्यांनी मुंबईतील पीआयबीच्या पश्चिम विभागाचे महासंचालक म्हणून काम केले आहे.