मेहकर : जिल्ह्यातील पहिली महिला चालक म्हणून मेहकर आगारात रुजू झालेल्या संगीता विष्णू लादे यांनी २ सप्टेंबर रोजी मेहकर ते खामगाव ही बस मेहकर बसस्थानकावरून खामगावकडे नेली.महिला आता सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. जिल्ह्यात दोन महिला चालक म्हणून रुजू झाल्या. दुसऱ्या मलकापूर आगारात रुजू झाल्या आहेत. त्यात मेहकर आगारात संगीता लादे या रुजू झाल्या आहेत. त्या मेहकरच्या रहिवासी आहेत.
एक वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या रुजू झाल्या. आज त्यांनी मेहकर ते खामगाव ही बस खामगावकडे नेली. मेहकर बसस्थानकावर आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे, व्ही. सहायक वाहतूक अधीक्षक कृष्णा पवार, सहायक वाहतूक निरीक्षक समाधान जुमडे, संजय मापारी, प्रदीप जोशी, गणेश राऊत, वाहतूक नियंत्रक समाधान सोनुने, लिपिक अंकुश शिंदे, प्रवीण तांगडे, वाहक छगन मुळे, एस. सानप सह एस.टी. कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते. बसमधील प्रवाशांनी सुद्धा महिला बस चालकाचे स्वागत केले.