अहमदनगर आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकारने मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाला कायम झुलवत ठेवले आहे. निवडणुकीपुरता आरक्षणाबाबत शब्द द्यायचा आणि नंतर आश्वासनांची पूर्तता करायची नाही, अशी या सरकारची पद्धत असून यामुळे सर्वच समाज दुखावला गेला असल्याची टीका खासदार सुप्रिया यांनी केली.
चोंडी (ता. जामखेड) येथे धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्यावतीने ६ सप्टेंबरपासून उपोषण सुरू असून खा. सुळे यांनी सोमवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. नाही. यावेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या आंदोलन सुरू झाल्यापासून शासनाचे कुणीही प्रतिनिधी उपोषणकर्त्यांकडे फिरकले नाही यातून असंवेदनशीलता दिसते. हे सरकार इतरांचे पक्ष, घरे फोडण्यात व्यस्त त्यांना दुष्काळ, आरक्षणासह राज्याच्या इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे केवळ ईडी, सीआयडी चौकशा व लक्ष्य द्यायला वेळ नाही