Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डीजेचा दणदणाट, पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे सात डीजे मालकांसह १४ जणांवर कारवाई


अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीत वेळोवेळी सूचना देऊनही डीजेचा आवाज वाढवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवसेनेचे (शिंदे गट) व भाजप पदाधिकाऱ्यांसह १४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगर शहर शिवसेना मंडळाचे अध्यक्ष अमोल हुंबे, डीजे मालक अनिल विश्वनाथ सिनलकर (रा. हवेली, पुणे), शिवसेना उद्धव ठाकरे मंडळाचे अध्यक्ष सागर विष्णू थोरात, नरसिंह राम रेड्डी (रा. नवी सांगवी, पिंपरी चिंचवड), तुळजाभवानी मंडळाचे अध्यक्ष निखिल सुभाषलाल गांधी, निखिल विलास पवार, (रा. कात्रज, जि. पुणे), छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल गहिले, प्रतीक शंकर लांडगे, (रा. विजापूर, जि. सोलापूर), माळीवाड्याचा राजा अध्यक्ष नीलेश खरपुडे, उत्तम विश्वनाथ अस्वले (रा. सावर्डे, जि. कोल्हापूर), वर्चस्व ग्रुप मंडळाचे अध्यक्ष अमित शिवाजी करे (रा. वंजारगल्ली), अजय महादेव जानराव (रा. लोणी काळभोर, हवेली, जि. पुणे), भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष करण ऊर्फ बंटी ढापसे (रा. वंजार गल्ली), शुभम शहाजी बकाले ( रा. जुळेवाडी, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तसेच डीजे ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले असून, कोतवाली व तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.