Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची कर्जतला भेट



 कर्जत : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. प्रशासकीय पातळीवर देखील पूर्वतयारी जोमाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी (दि.२९) शुक्रवारी कर्जत-जामखेड तालुक्यातील प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला तसेच सूचना केल्या.

कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्याकडून मतदान यंत्र स्ट्रांग रूम, मतदान केंद्र, जिल्हा सरहद्दीवरील चेक पोस्ट, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण व्यवस्था तसेच फिरते पथक आदींचा माहिती घेतली. पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्याकडून पोलिस प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला.

यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील, पोलिस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, तहसीलदार गुरू बिराजदार, तहसीलदार गणेश माळी, पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, प्रभारी गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी अजय साळवे, गटशिक्षणाधिकारी उज्ज्वला गायकवाड, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, प्रकाश बुरुंगले, गुप्तचर विभागाचे महादेव कोहक आदी विभागप्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.