Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संगमनेरात हेरॉईन, गांजासह रोकड जप्त ५ लाखांचा मुद्देमाल; पोलिसांची कारवाई



संगमनेर : शहरातील शिवाजीनगर  (मालदाड रस्ता) परिसरात पोलिसांनी सोमवारी (दि.१) संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कारवाई करत ३६ ग्रॅम हेरॉईन, साडेचार किलो गांजा आणि ४ लाख १५० रुपयांची रोकड असा एकूण ५ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. संगमनेरात हेरॉईनसह गांजा विकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

त्यानुसार अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेरात पोहोचले. या पथकासोबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांचे पथक हेरॉईन आणि गांजाची विक्री होत असलेल्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी तेथे कारवाई करत ४४ हजार ९८० रुपये किमतीचा ४ किलो ४९८ ग्रॅम गांजा, ७२ हजार रुपये किमतीचे हेरॉईन (गर्द) आणि ४ लाख १५० रुपयांची रोकड असा एकूण ५ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा मुद्देमाल शहर पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.