Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रावर सोयीसुविधा द्या


शेवगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व प्रकारच्या दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभाग व सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर विविध प्रकारच्या सोयी-सुविधांबाबत सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख यांनी तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

दिव्यांग मतदारांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची इच्छा असल्यास केंद्रनिहाय अधिकाऱ्यांमार्फत विहित नमुन्यातील अर्जाचे वाटप दिव्यांग मतदारांच्या घरोघरी करण्यात यावे. सक्षम अॅपची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. मतदानाच्या रांगेत दिव्यांगांना प्राधान्य देण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात. मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, वैद्यकीय सुविधा, मदत केंद्र, सुलभ शौचालय, मतदान प्रक्रियेविषयी माहिती देणारे फलक अशा बाबींकडे विशेष लक्ष देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी सुरेश बर्डे, सुनील वाळके उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.