Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पदवीचा उपयोग आदिवासी सेवेसाठी

राजूर : मी जरी मंत्र्यांची नात व  आमदारांची मुलगी असले तरी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करावाच लागतो. आजोबा मधुकरराव पिचड यांचे स्वप्न होते मी डॉक्टर व्हावे, ते स्वप्न पूर्ण केले याचा आनंद आहे. पुढे एमएस करून आदिवासी भागातील रुग्णांवर उपचार करून त्यांची सेवा करण्याचा मनोदय एमबीबीएसची पदवी प्राप्त केलेल्या डॉ. मधुरा पिचड यांनी व्यक्त केला.

माजी आमदार वैभव पिचड यांच्या कन्या मधुरा या विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाल्या. त्याबद्दल राजूर येथील सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी त्यांचा सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी सरपंच हेमलता पिचड होत्या. आदिवासी उन्नती सेवा डॉ. मधुरा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, उपाध्यक्ष सी. बी. भांगरे, उपसरपंच संतोष बनसोडे, शांताराम काळे, विद्याचंद्र सातपुते, संदीप शेटे, उद्योजक भारत पिंगळे, योगेश महाले, प्राचार्या मंजूषा काळे, मुख्याध्यापक विलास महाले, प्राचार्य कैलास तेलोरे, भरत घोरपडे, डॉ. वासनिक, डॉ. कडलग, डॉ. राहुल फडके, शांताराम वैद्य उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. मधुरा म्हणाल्या, आपण ग्रामीण भागातील असलो तरी तो न्यूनगंड बाजूला करून मेहनत आणि परिश्रम घ्या, वैद्यकीय क्षेत्रात खूप संधी आहेत. यावेळी श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था, आदिवासी उन्नती शिक्षण संस्था, राजूर ग्रामपंचायत, पत्रकार संघ, विद्यार्थी पालक संघ, तनिष्का महिला यांच्या वतीने डॉ. मधुरा यांचा सत्कार करण्यात आला. किरण भागवत व श्रीराम पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर सतीश काळे यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या नेत्ररोग तपासणी शिबिराचे उदघाटन डॉ. मधुरा पिचड यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात ३०० विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.