Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ नागरिक, कर्मचाऱ्यांचे मतदान १३ मे पूर्वीच पार पडणार



प्रशासनाचे नियोजन : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी पंढरपूर पॅटर्न

अहमदनगर : १८ व्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक आयोग पंढरपूर पॅटर्न राबवणार आहे. ८५ वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन पोस्टल मतदान करून घेतले जाणार आहेत. नगर, शिर्डी लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे; परंतु ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची मतदान प्रक्रिया ९, १० आणि ११ मे अशा तीन दिवसांत पार पडणार आहे.

असक्षम असलेल्या मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी आयोगाने स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली आहे. यासाठी दोन्ही लोकसभेच्या १२ विधानसभा मतदारसंघातील १२० नोडल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २७ मार्च रोजी प्रशिक्षण देण्यात आले. मतदान करुन घेण्यासाठी पाच कर्मचाऱ्यांची टीम असणार आहे. यामध्ये पोलिस, दोन यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी अर्जदाराला संपूर्ण प्रक्रिया समजावून आहेत. त्यानंतर अर्जदार मतदान करणार आहे. पडताळणी करणार आहेत. अर्जदाराची स्थिती पाहून आयोगाला अहवाल दिला जाणार आहे. त्यानंतर निश्चित झालेल्या अर्जदारांची संख्या पाहून पुढील तीन दिवसांत रुट ठरवून पथकांची विभागणी केली जाणार आहे.

बॅलेट पेपरवर मतदान

८५ वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार आणि दिव्यांग मतदारांच्या घरीच बूथ उभारले जाणार आहे. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान होणार आहे. निवडणूक अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, कॅमेरामन हे असणार आहे. अधिक असक्षम अर्जदार मदतनीसची मदत घेऊ शकतो, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. अर्जदारांनी अर्ज केल्यानंतर स्थानिक अधिकारी प्रत्यक्ष जाऊन

सरासरी १५ अर्जदारांचे मतदान

अर्जदाराला १८ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत स्थानिक बीएलओकडे अर्ज करावा लागणार आहे. यानंतर अर्जानुसार ९, १० आणि ११ मे अशा तीन दिवसांत प्रत्येक अर्जदाराच्या घरी बूथ उभारून मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया गुप्त राहण्यासाठी व्हिडीओ शुटिंग केले जाणार आहे. एका दिवसात सरासरी १५ अर्जदारांचे मतदान होण्याचा अंदाज आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.