Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चेडेचांदगाव शालेय समितीत महिलाराज

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील चेडेचांदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रियंका सुनील जावळे व उपाध्यक्षपदी मीरा संदीप चेडे यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महिलांचीच निवड झाल्याने शालेय समितीत महिलाराज अवतरले. गुरुवारी (दि. २८) सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाळेत सन्मान केला. चेडेचांदगाव झेडपी शाळेत २०२४-२६ या दोन वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी मुख्याध्यापक गोरक्षनाथ दातीर यांनी प्रास्ताविकातून शालेय समितीच्या कामकाजाविषयी माहिती दिली. निवडीचे निकष पदवीधर शिक्षक संजय पुंडे यांनी पालकांना सांगितले. त्यानंतर प्रत्येक वर्गातून एक महिला व एक पुरुष पालक सदस्य, स्थानिक प्राधिकरण, शिक्षण तज्ज्ञ, दुर्बल घटक प्रवर्ग, शिक्षक प्रतिनिधी, मुख्याध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी अशा १७ सदस्यांची निवड करण्यात आली. निवडलेल्या पालक सदस्यांतून अध्यक्ष, उपाध्यक्षांची एकमताने निवड करण्यात आली. सदस्य म्हणून संदीप भिसे, भाऊसाहेब नागरे, आशामती सुनील जन्हाड, शिवनंदा परमेश्वर चेडे, कुसुम बापूसाहेब चेडे, अंबादास चेडे, बाबासाहेब चेडे, पांडुरंग कणसे,


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.