Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दक्षिणेत ओबीसी तर शिर्डीत बौद्ध उमेदवार देणार


अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यात - सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला - आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा - मतदारसंघात ओबीसी तर शिर्डीत - आम्ही बौद्ध उमेदवार देणार असल्याचे - आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन - चव्हाण व अॅड. अरुण जाधव यांनी - शुक्रवारी नगर येथे माध्यमांशी - बोलताना सांगितले.

चव्हाण म्हणाले लोकसभा निवडणुकीत धर्मांध पक्षाविरोधात संघर्ष करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न केला मात्र, आघाडीतील काही प्रस्थापितांना आम्ही त्यांच्यासोबत येऊ नये, असे वाटत होते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगरसाठी अरुण जाधव, प्रतीक बारसे, हनुमंत पावणे, संतोष गलांडे, प्रा. महेंद्र शिंदे, राजकुमार आघाव, दिलीप खेडकर, आरती झालदवार, गोरख आळेकर, अनिल पाडळे हे इच्छुक आहेत. शिर्डीसाठी उमेदवारीसाठी २५ जण इच्छुक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी प्रतीक बारसे, संतोष गलांडे, योगेश साठे, अनिल जाधव, वर्षा बाचकर आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.