Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बाबांच्या जयघोषाने दुमदुमली देवगडनगरी

नेवासा : नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे किसनगिरी बाबांच्या पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळ्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. यावेळी किसनगिरी बाबा की, जय अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. दिवसभरात अनेक दिंड्या देवगड येथे दाखल झाल्या.पाच दिवस चालणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी भगवान दत्तात्रय व सद्‌गुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीस देवगड दत्त पीठाचे प्रमुख महंत

भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायण होऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन करून पारायणाचा शुभारंभ करण्यात आला. यज्ञ मंडपात तीन दिवशीय महाविष्णू याग आयोजित केला आहे. मंगळवारी महंत कैलासगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, महंत रमेशानंद गिरी महाराज, महंत ऋषिनाथ महाराज, महंत गोपालानंदगिरी महाराज, आमदार शंकरराव गडाख व माजी आमदार

बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगड येथे भेट देऊन बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारच्या सत्रात हजारो भाविकांच्या उपस्थितीत भास्करगिरी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रय व किसनगिरी बाबांची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ६ एप्रिल रोजी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे सकाळी ८ ते १० यावेळेत काल्याच्या कीर्तनाने पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.