Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजीला मारहाण; चुलत्याला धमकी

 


राहुरी: उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून नातवाने आजीला मारहाण करून चुलत्याला तलवारीचा धाक दाखवून धमकावले. ही घटना राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे दि. १ एप्रिल रोजी घडली.

शकुंतला रामभाऊ जाधव (वय ७५) या धामोरी खुर्द येथे मुलगा व मोठा नातू युवराज यांच्यासह राहतात. त्यांच्या शेजारीच दुसरा मुलगा त्याच्या कुटुंबासह राहतो. दि. १ एप्रिल रोजी शकुंतला जाधव या घरी असताना शेजारी राहणारा त्यांचा नातू प्रीतम जाधव हा आला आणि 'तुझ्या मुलीला मी दिलेले उसने पैसे मला परत देण्यास

सांग', असे म्हणाला. तेव्हा शकुंतला जाधव त्याला 'तू शिवीगाळ करू नको', असे म्हणाल्या. याचा राग आल्याने प्रीतमने आजी शकुंतला यांना धक्काबुक्की केली. त्यावेळी मोठा मुलगा राजकुमार हे भांडण मिटविण्यास आले. आरोपी प्रीतम याने त्यांनाही मारहाण केली. नंतर घरातून तलवार घेऊन आला व राजकुमार यांना धमकावले. याबाबत आरोपी प्रीतम जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.