Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री 'माझी शाळा'चा ऑगस्टमध्ये दुसरा टप्पा



शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात ५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. हे अभियान ४ सप्टेंबर रोजी १ महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल, अशी माहिती शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिली आहे.

राज्य सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाचा पहिला टप्पा राबविला. पहिल्या टप्प्यात २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत सहभागी झाले. झाल्यामुळे काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेसाठी उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे.

तीन स्तरांवर होतेय अंमलबजावणी

राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्त्तिमत्त्वाची जडणघडण करणे हीदेखील अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग अव वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा तीन स्तरांवर राबविण्यात येत आहे.


असे होईल शाळांचे गुणांकन
• पायाभूत सुविधा - ३३ गुण
• शासन ध्येयधोरण
अंमलबजावणी - ७४ गुण
• शैक्षणिक संपादन ४३ गुण


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.