Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीरामपुरात कांदा ३,२०० रुपये


 श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवार, दि.१७ रोजी गोणी कांदा मार्केटमध्ये १४ हजार १०० कांदा गोणीची, तसेच मोकळा कांदा लिलाव पद्धतीत ६१ साधनांतून आवक आली होती. गोणीतील कांद्यास सर्वाधिक ३,२०० रुपये, तर मोकळा कांद्यास सर्वाधिक २,९०० रुपये भाव मिळाला.

गोणीतील प्रथम श्रेणीचा कांदा २,५०० ते ३,२००, द्वितीय १,९०० ते २,५००, तृतीय १,३०० ते १,९००, खाद ३०० ते १,३०० व गोल्टी २,००० ते २,६०० रुपये प्रतिक्विंटल विकला. मोकळा कांदा लिलावात प्रथम श्रेणीचा कांदा २,७०० ते २,९००, द्वितीय २,४०० ते २,६५०, तृतीय २,१५० ते २,३५०, गोल्टी २,२०० ते २,६०० व खाद १,८०० ते २,१०० रुपये प्रतिक्विंटल विकला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.