Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

घरासाठी ४० लाखांची मागणी; विवाहितेचा छळ



राहुरी : घर घेण्यासाठी माहेरहून ४० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत सासरच्या सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहल सुहास मिरपगार (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, शेवगाव, हल्ली रा. कासार गल्ली, राहुरी) यांचा विवाह सुहास मिरपगार (रा. शेवगाव) याच्याशी दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी झाला होता. पती सुहास नेवासा पंचायत समितीत नोकरीस आहे. सुहास याचे पहिले लग्न झालेले असून, त्याला एक आठ वर्षांचा मुलगा आहे. त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली. असे स्नेहल यांना कळाले. तेव्हा सुहास याने स्नेहल यांना दमदाटी करून गप्प बसविले. त्यानंतर घर घेण्यासाठी स्नेहल यांनी माहेरहून ४० लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी सासरचे लोक स्नेहल यांचा छळ करू लागले. याबाबत स्नेहल मिरपगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुहास मिरपगार, सलोमिनी मिरपगार, विद्यानंद मिरपगार, प्रवीणकुमार मिरपगार, अमता मिरपगार, सासूची बहीण पुष्पा कांबळे, पतीचे मामा सॅमसन ठोंबे (सर्व रा. शेवगाव) या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.