Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिर्डीच्या देणग्यांवरील कर आकारणीचा निकाल राखीव



मुंबई : धर्मादाय आणि धार्मिक ट्रस्ट असलेल्या श्री शिर्डी साई बाबा संस्थान ट्रस्टला मिळणाऱ्या बेनामी देणग्यांना आयकरातून सूट द्यावी की नाही, याबाबतचा निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. यासंदर्भातील आयकर अपिलीय न्यायाधिकरणाच्या २५ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशाला आयकर विभागाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शिर्डी साई बाबा संस्थान ट्रस्ट धर्मादाय आणि धार्मिक दोन्ही असल्याने ते बेनामी देणग्यांवरील करातून सूट मिळण्यास पात्र आहेत, असा निर्णय या न्यायाधिकरणाने दिला होता. 

त्यावर दाखल केलेल्या आयटी विभागाच्या अपिलावरील निर्णय न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने बुधवारी राखून ठेवला. २०१९ पर्यंत शिर्डी संस्थेला ४०० कोटी रुपयांहून अधिक देणगी मिळाली. त्यातील २.३० कोटी रुपये धार्मिक हेतूसाठी खर्च झाले. देणग्यातील वैद्यकीय सुविधांसाठी खर्च केला जातो, ज्यावरून ते केवळ धर्मादाय ट्रस्ट असल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद ट्रस्टच्या वकिलांनी केला. आयकर विभागाने ट्रस्टला धर्मादाय ट्रस्ट म्हणून संबोधण्यात दोष असल्याचे सांगत ट्रस्टच्या वकिलांनी विविध समुदायातील भक्त त्यांच्या मंदिराला भेट देतात आणि ते पूजा विधी करतात. त्यामुळे ट्रस्ट धार्मिक ट्रस्ट नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.