Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुळा ३५ टक्के भरले


 

राहुरी : मुळा धरणात कोतूळ येथून ४ हजार २२७ क्युसेकने पाणी आवक सुरू आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात ९ हजार २१८ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे. वरुण राजाने पाणलोट क्षेत्रावर हजेरी लावल्याने गेल्या दोन दिवसांपासून २२५ दशलक्ष घनफूट नवीन पाणी धरणात जमा झाले, अशी माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.

मुळा धरणाच्या पाणलोटातून दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. अशीच आवक सुरू राहिल्यास मुळा धरण यंदा सलग ६ व्या वेळी पूर्ण क्षमतेने भरणार आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यावर १० हजार १२१ हेक्टर क्षेत्र आहे. तर उजव्या कालव्यावर ७० हजार ६८९ हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे.

मुळा धरणाचे १९७२ ला बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून यंदाच्या वर्षी ३५ वेळा धरण भरणार आहे. कोतूळ येथे आतापर्यंत १५७ मिलिमीटर तर मुळानगर येथे २७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.