Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

९ महसूल मंडळाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा सर्वाधिक जामखेड तर राहात्यात कमी



अहमदनगर : मागील पंधरा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत रिमझिम पाऊस पडतो आहे. शनिवारी २.९ जिल्ह्यात मिमी पावसाची नोंद झाली असून जुलै महिन्यात आतापर्यंत १४६.४ मिमी पाऊस झाला आहे. जामखेड तालुक्यातील सर्वाधिक २६१.६ मिमी पाऊस झाला आहे, तर सर्वांत कमी राहाता तालुक्यात ८६.३ मिमी. पाऊस पडला. जिल्ह्यातील ९७ महसूल मंडळापैकी ९ मंडळांत ७५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील दक्षिण भागात जोरदार पाऊस झाला आहे. या तालुक्यातील छोटे-मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नद्या वाहू लागल्या आहेत. उत्तरेतील राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यात १०० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. जामखेड २६१.६ मिमी, पाथर्डी २०२ मिमी, अकोले २२० मिमी पाऊस झाला आहे.

मागील पंधारा दिवसांपासून होत  असलेल्या रिमझिम पावसाने सोयाबीन, बाजारी, कपाशी, तूर, मका यासह चारा पिके पिवळे पडू लागले आहेत, तर ढगाळ वातावरणाने अनेक पिकांवर रोग पडल्याचे दिसून येते आहे. सतत पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना कीटनाशकाची फवारणी करता येत नाही. आता शेतकऱ्यांना सूर्य प्रकाशाची प्रतीक्षा आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस झाला आहे. मात्र, नऊ महसूल मंडळातील गावांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.


७५ मिमीपेक्षा कमी पाऊस (महसूल मंडळ)

एरंडगाव ७२.९ मिमी, सोनई ४३.४ मिमी, वडाळा ६९ मिमी, राहुरी ७०.७ मिमी, देवळाली ७०.२ मिमी, संगमनेर ६६.२ मिमी, सुरेगाव ७२ मिमी, बेलापूर ७४.६ मिमी, राहाता ४७.६ मिमी, शिर्डी ७१.१ मिमी.

९० मिमीपेक्षा कमी पाऊस (महसूल मंडळ)

• ताहाराबाद ८०.९ मिमी, • कोपरगाव ८४.९ मिमी, • दहिगाव ८६.४ मिमी, श्रीरामपूर ८३ मिमी, • पुणतांबा ७९.३ मिमी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.